विद्युत ताल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, कुही पोलिसांची कारवाई
कुही := कुही पोलिस स्टेशन हद्दीतील मोजा नवरगाव येथून
शेतातून विद्युऊ ताल चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा कुही
पोलिसांनी एका दिवसात छडा लावत मुसक्या आवळल्या आहेत.
तालुक्यातील मौज नायगाव येथील कोल्हे फळबागे मध्ये
असलेल्या १५०० फूट विद्युत कंडक्टर तार व ७० फूट
जिआय तार असा एकूण २८००० हजार रुपये इतका माल
अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना (दिनांक ८/०८/०२४)
कुही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
लगेच कुही पोलिसांनी घटना स्थळी जावुन घटनेची चौकशी
केली. एका शेतकऱ्याने लाल रंगाच्या आटो मध्ये माल नेल्याचे
चौकशीत समजले, पोलिसांनी तपासाचे चक्र घुमवून अवघ्या
एका दिवसातच संशयित असलेले आरोपी असलम शेख नूर
वय (३३) रसूल शेख वय(६०) या दोघानाही रा. मोठा ताज
बाग त्यांना ताब्यात घेऊन चोरी कबुल केले.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेले १५०० फूट विद्युत तार
७० फूट जिआय तार असा एकूण २८००० हजार मालासह
चोरांनी वापरेल्या लाल रंगाच्या १ लाख २५ हजार
किमतीच्या मालवहू आँटो क्र. एम एच ४९ ए आर ५३०८
जप्त केला आहे.
हि कारवाई कुही पोलिस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर
यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले,
ओमप्रकास रेहपाडे, राहुल देहिकर ,अनिल करडखेडे यांनी
केली.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना कर्मचारी ऑफ ग्रॅज्युईटी अॅक्ट नुसार ग्रॅज्युईटी मिळण्यास पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देवून दीड वर्षे होऊन देखील राज्य शासनामार्फत अत्यंत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविकांना काम करावे लागत असून मानधन वाढ करण्यात यावी, राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घेणे, सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना अर्ध्या मानधनाइतकी पेन्शन सुरू करणे, अंगणवाडीमध्ये शिजविल्या जाणार्या पोषण आहारासाठी लागणार्या साहित्यासाठी येणारा खर्च महागाईमुळे वाढत असून देण्यात येणार्या रकमेत आणखी वाढ करण्यात यावी, अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजाकरिता मोबाईल संच देण्यात यावेत, सर्व मिनी अंगणवाड्या नियामित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे, अंगणवाडी कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचार्यावरील सक्ती बंद करावी, 30 दिवसांची भरपगारी रजा देण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना मुख्यसेविका पदाकरीता पात्र करण्यात यावी अशा मागण्या घेवून अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
अंगणवाडी कर्मचारी 1975 पासून एबाविसे योजनेमध्ये पुर्णवेळ लहान बालक, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेऊन, पुढची पिढी घडविण्याचे कर्तव्य बजावत आहे. अंगणवाडी कर्मचारी पुरक पोषण आहार, आरोग्य, पुर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, गृहभेटी व इतर संदर्भीय सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देत आहे.
अंगणवाडी कर्मचार्यांना दिवसभर काम करुनही अनेक व्यवसायाच्या किमान वेतनापेक्षाही अत्यंत तुटंपुजे मानधन मिळत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये शासनाने जी मानधन वाढ केली होती, ती अत्यंत कमी होती. अंगणवाडी कर्मचार्यांना मिळणारे मानधन हे विविध योजनेंतर्गत तत्सम काम करणार्या कर्मचार्यांपेक्षा खुप कमी आहे. सध्याच्या महागाईमध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनात काम करणार्या अंगणवाडी कर्मचार्यांना जीवन जगणे कठीण होत असल्याच्या भावना शासनाकडे मांडून सेविकांनी सदर संप पुकारला असल्याचे यावेळी सांगण्यातआले.
वडाळा पैकू येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेच्या वतीने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन लूंबिनी बुद्धविहार, वडाळा पैकू येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेचे अध्यक्ष गुलाबराव गणवीर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी विचारवंत प्रभाकर पिसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश डांगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक नारायण कांबळे,दयाराम रामटेके उपस्थित होते.दयाराम रामटेके यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना माल्यार्पण करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक सुरेश डांगे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साऱ्या जगाला हेवा वाटेल असे संविधान भारताला दिले आहे. हे संविधान आता धोक्यात आले आहे. सर्वांगसुंदर असे हे संविधान वाचवायची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचे संरक्षण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ते आपण पार पाळले पाहिजे. संविधानाच्या संरक्षणासोबतच संविधान घराघरात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानाचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी केला पाहिजे. संविधानाचे संरक्षण झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले धम्मचक्र गतिमान होत राहील आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण होईल. सध्या शिक्षणापासून बहुजन समाजाला वंचित ठेवण्याचा डाव शासनाचा आहे. तो डाव सर्वांनी एकत्र येऊन हाणून पाडायला हवा. ज्या शिक्षणासाठी महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आणि शिक्षणाने पुरोगामी महाराष्ट्र घडवला. त्याच पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण संपवून बहुजन समाजाला गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे कुटील कारस्थान उलथवून टाकण्याचे आवाहनही यावेळी केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर पिसे यांनी वाईट रुठी,परंपरा फेकल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर ऐतिहासिक आहे. त्यांनी केलेली ही मोठी क्रांती आहे. याच क्रांतीच्या माध्यमातून बौद्ध समाज आज प्रगतीच्या वाटा चालत आहे. या समाजापासून ओबीसी बांधवांनी खूप शिकण्यासारखे आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आपण ताठ मानेने जगत असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषण गुलाबराव गणवीर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन शिवराम मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक गिरीधर घोनमोडे यांनी केले. आभार भाऊराव साळवे यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.